खाती केंद्रात तुमचे WhatsApp खाते जोडणे
खाती केंद्रातील WhatsApp काय आहे?
खाती केंद्र एक असे ठिकाण आहे जिथे तुम्ही तुमच्या Facebook, Instagram, WhatsApp आणि Meta खात्यांसाठी खाते सेटिंग्ज आणि कनेक्टेड अनुभव केंद्रीय स्थानी व्यवस्थापित करू शकता. तुमचे WhatsApp खाते खाती केंद्र यामध्ये जोडणे पूर्णपणे ऐच्छिक आहे. तुम्ही तुमचे WhatsApp खाते खाती केंद्र यामध्ये कधीही जोडू शकता आणि त्यामधून काढू शकता.
तुमचे WhatsApp खाते खाती केंद्रात जोडल्यामुळे, Meta ॲपवर कार्य करणारे अनुभव तुम्ही अनलॉक कराल, जसे की WhatsApp वर तयार केलेले स्टेटस सहजपणे Facebook किंवा Instagram वरील स्टोरीजवर शेअर करण्याची क्षमता. तुम्ही काही खाते सेटिंग्ज एकाच ठिकाणी व्यवस्थपितदेखील करू शकाल, जसे की प्रोफाईल माहिती ॲडजस्ट करणे. तुमचे WhatsApp खाते खाती केंद्रात जोडण्याचा अर्थ असा की WhatsApp आणि Meta हे लाभ प्रदान करण्यासाठी माहिती शेअर करतील, जे आम्ही खाली आणि WhatsApp गोपनीयता धोरण यामध्ये समजावून सांगत आहोत.
तुमचे WhatsApp खाते खाती केंद्र यामध्ये जोडण्यामुळे तुमच्या WhatsApp वैयक्तिक मेसेज किंवा कॉलच्या गोपनीयतेवर प्रभाव पडत नाही, ते एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित राहतील. इतर कोणीही, अगदी WhatsApp किंवा Meta देखील ते वाचू किंवा ऐकू शकत नाही. आम्ही तुमच्या संपर्क याद्या इतर कोणत्याही Meta कंपनी सोबत शेअरदेखील करत नाही.
अर्थातच, WhatsApp जगभरातील लोकांना जलद आणि विश्वसनीय सर्व्हिससह सपोर्ट करण्याकरिता Meta च्या पायाभूत संरचनेवर अवलंबून असते, जसे की सर्व्हर. तथापि, WhatsApp वैयक्तिक डेटामधील ॲक्सेस प्रतिबंधित केला आहे त्यामुळे त्याचा वापर इतर Meta ॲपद्वारे – यात जाहिरातींचा समावेश आहे – केला जाणार नाही जोपर्यंत तो आम्ही किती लोकांना सेवा पुरवतो हे निर्धारित करण्यासाठी, लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा Meta प्रॉडक्टवर कार्य करणारी ऐच्छिक वैशिष्ट्ये प्रदान करण्यासाठी केला जात नाही.
खाती केंद्रातील WhatsApp हे या ऐच्छिक वैशिष्ट्यांपैकी एक आहे. इतर ऐच्छिक वैशिष्ट्यांमध्ये Meta AI सह किंवा Meta ची व्यवसाय टूल वापरणार्या मेसेजिंग व्यवसायांसह चॅट करण्याचा समावेश आहे. ऐच्छिक वैशिष्ट्ये नेहमी ॲपमध्ये स्पष्टपणे समजावून सांगितली जातात त्यामुळे तुमच्यासाठी योग्य असलेली निवड तुम्ही करू शकता.
मी माझे WhatsApp खाते खाती केंद्रात जोडताना WhatsApp कोणती माहिती संकलित करते?
WhatsApp गोपनीयता धोरण अशा माहितीचे वर्णन करते जी WhatsApp तिच्या सर्व्हिसवरून संकलित करते. तुम्ही तुमचे WhatsApp खाते खाती केंद्रात जोडण्याची निवड करता तेव्हा, WhatsApp देखील यासारखी माहिती संकलित करते:
- डिव्हाईस आणि कनेक्शन माहिती, जसे की तुम्ही प्रत्येकवेळी खाती केंद्रात WhatsApp वापरता तेव्हा तयार केलेला युनिक आयडी.
- वापर आणि खाती केंद्रातील WhatsApp कशी कामगिरी करत आहे त्याबद्दल लॉग माहिती, जसे की सर्व्हिस-संबंधित, निदानात्मक आणि कामगिरीबाबत माहिती, उदा. लॉग फाईल, टाईमस्टँप, क्रॉस पोस्ट ॲक्टिव्हिटी आणि देखरेखीचे लॉग.
खाती केंद्राद्वारे उपलब्ध असलेले कनेक्टेड अनुभव वापरण्यासाठी तुम्हाला सक्षम करण्याकरिता, WhatsApp इतर Meta कंपन्या यांच्याकडीलदेखील यासारखी माहिती प्राप्त करते:
- खाते माहिती, जसे की तुम्ही ज्यावर माहिती क्रॉस पोस्ट करता त्याच खाती केंद्रामधील Facebook किंवा Instagram खात्यांशी संबंधित ओळखकर्ते.
- तुमची Facebook किंवा Instagram खाती तुमच्या WhatsApp खात्याशी कनेक्ट करण्यासाठी आवश्यक असलेली डिव्हाईस आणि कनेक्शन माहिती.
- Meta खात्यांवर (उदा. Facebook) नमूद केलेली तुमच्या वयाबाबतची माहिती, जी आम्हाला कोणतीही वयाशी संबंधित विसंगती मिटवून सुसंगत करणे यासारख्या गोष्टी करण्यात आणि Meta कंपनी प्रॉडक्ट साठी पात्रता निर्धारित करण्यात मदत करते.
मी माझे WhatsApp खाते खाती केंद्रात जोडल्यास Meta माझ्याबद्दल कोणती माहिती प्राप्त करेल?
तुम्ही तुमचे WhatsApp खाते खाती केंद्रात जोडण्याची निवड करता तेव्हा, इतर Meta कंपन्या यांसारखी माहिती प्राप्त करतात:
- खाते माहिती जसे की तुमचा फोन नंबर आणि तुमचा WhatsApp प्रोफाइल फोटो (तुमच्या खाती केंद्राच्या सेटिंग्जवर प्रदर्शित करण्यासाठी, उदाहरणार्थ).
- वयाबाबतची माहिती (प्रदान केली असल्यास), जी Meta ला कोणतीही वयाशी संबंधित विसंगती मिटवून सुसंगत करणे यासारख्या गोष्टी करण्यात आणि Meta कंपनी प्रॉडक्ट साठी पात्रता निर्धारित करण्यात मदत करते.
- युजर कंटेन्ट जसे की तुमचे WhatsApp स्टेटस, तुम्ही तुमचे स्टेटस अपडेट Facebook किंवा Instagram स्टोरीजवर शेअर केले असल्यास.
- डिव्हाइस आणि कनेक्शन माहिती, जसे की तुमची ॲप आवृत्ती किंवा WhatsApp मधील तुमची सेट केलेली डिव्हाईस भाषा.
- वापर आणि लॉग माहिती, ज्यात तुम्ही आमच्या सर्व्हिस कशा वापरता याबाबतची माहिती समाविष्ट असते जसे की तुम्ही तुमचे WhatsApp खाते खाती केंद्रात जोडले आहे की नाही आणि तुम्ही त्याचा वापर कसा करता किंवा तुम्ही Facebook किंवा Instagram स्टोरीजवर तुमचे WhatsApp स्टेटस किती वेळा शेअर केले आहे.
- लागू असल्यास तुमच्या चॅनेलच्या वापरासंबधित माहिती (आम्ही चॅनेलसाठी संकलित करतो ती माहिती याबद्दल अधिक जाणून घ्या).
मी माझे WhatsApp खाते खाती केंद्रात जोडल्यास WhatsApp कोणत्या हेतूंसाठी माझी माहिती वापरते?
तुम्ही तुमचे WhatsApp खाते खाती केंद्रात जोडता तेव्हा WhatsApp तुमची माहिती खाली दिलेल्या हेतूंसाठी वापरते:
- तुम्हाला खाती केंद्रात WhatsApp साठी सर्व्हिस प्रदान करणे आणि WhatsApp वर वैशिष्ट्यांचे फंक्शन आणि अनुभवांना सुलभ करणे, ज्यात यासारख्या गोष्टींचा समावेश होतो:
- तुमची खाते पात्रता तपासणे आणि तुमचे WhatsApp खाते खाती केंद्रात जोडणे.
- तुमची खाते माहिती आणि सेटिंग्ज खात्यांवर मॅच होण्यासाठी त्यांना ॲडजस्ट करणे.
- तुमच्या डिव्हाईसने आधीपासून समान खाती केंद्रातील अन्य Meta खात्यात लॉग इन केले असेल तर WhatsApp मध्ये सहजपणे ॲक्सेस करण्यासाठी सिंगल-साईन-ऑन सक्षम करणे.
- कनेक्टेड अनुभवांवर नियंत्रणे प्रदान करणे जसे की, तुमचे WhatsApp स्टेटस Facebook किंवा Instagram स्टोरीजवर शेअर करणे.
- WhatsApp सर्व्हिस आणि प्रॉडक्ट सुधारित करणे जसे की, खाती केंद्रातील WhatsApp आणि यात यासारख्या गोष्टी समाविष्ट होतात:
- ट्रबलशूटिंग, निदान करणे, विश्लेषण करणे आणि प्रॉडक्ट समस्या डीबग करणे.
- सर्व्हिस कामगिरीचे निरीक्षण करणे, विश्वसनीयता आणि कार्यक्षमता.
- खाती केंद्रात विद्यमान आणि नवीन वैशिष्ट्ये अपडेट करणे आणि नवीन वैशिष्ट्यांच्या प्रभावाचे मूल्यांकन करण्यासाठी प्रयोग करणे.
- खाती केंद्रात वैशिष्ट्यांचा भविष्यात अंगिकार करण्याचा अंदाज वर्तवण्यासाठी खाती केंद्रातील WhatsApp चा वापर किती चांगल्या प्रकारे आणि किती वारंवार केला जात आहे हे समजून घेण्यासाठी मेट्रिक्स तयार करणे आणि त्यांचे प्रमाणिकरण करणे.
- यासारख्या गोष्टी करण्यासाठी समान खाती केंद्रातील खात्यांवरील माहिती वापरण्याकरिता अन्य Meta कंपन्यांसोबत कार्य करणे:
- खाती केंद्रात इतर Meta कंपनी प्रॉडक्ट खात्यांसह तुमचे WhatsApp खाते संबद्ध करणे.
- तुम्ही निवडलेले कनेक्टेड अनुभव तुम्हाला प्रदान करणे आणि तुमचे अनुभव खात्यांवर सुधारित करणे.
मी माझे WhatsApp खाते खाती केंद्रात जोडल्यास Meta माझी माहिती कशी वापरते?
तुम्ही तुमचे WhatsApp खाते खाती केंद्रात जोडण्याची निवड केल्यास, Meta तिचे प्रॉडक्ट आणि सर्व्हिस प्रदान करणे, ते वैयक्तिकृत आणि सुधारित करणे यांसारख्या गोष्टी करण्यासाठी तुमच्या माहितीचा वापर Meta गोपनीयता धोरण यामध्ये वर्णन केल्यानुसार करेल यात तुम्हाला जाहिराती दर्शवणे, त्यांच्या कामगिरीचे मापन करणे आणि आणखी वैयक्तिकृत वैशिष्ट्ये, कंटेन्ट आणि सूचना Meta कंपनी प्रॉडक्ट वर प्रदान करणे याचा, तसेच सुरक्षा, सुरक्षितता आणि एकीकरणास प्रमोट करणे याचा समावेश आहे. Meta च्या स्वत:च्या अटी आणि गोपनीयता धोरण तुमच्या Meta सर्व्हिस आणि प्रॉडक्टच्या वापराचे नियमन करेल.
अर्थातच, WhatsApp जगभरातील लोकांना जलद आणि विश्वसनीय सर्व्हिससह सपोर्ट करण्याकरिता Meta च्या पायाभूत संरचनेवर अवलंबून असते, जसे की सर्व्हर. तथापि, WhatsApp वैयक्तिक डेटामधील ॲक्सेस प्रतिबंधित केला आहे त्यामुळे त्याचा वापर इतर Meta ॲपद्वारे – यात जाहिरातींचा समावेश आहे – केला जाणार नाही जोपर्यंत तो आम्ही किती लोकांना सेवा पुरवतो हे निर्धारित करण्यासाठी, लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा Meta प्रॉडक्टवर कार्य करणारी ऐच्छिक वैशिष्ट्ये प्रदान करण्यासाठी केला जात नाही.
खाती केंद्रातील WhatsApp हे या ऐच्छिक वैशिष्ट्यांपैकी एक आहे. इतर ऐच्छिक वैशिष्ट्यांमध्ये Meta AI सह किंवा Meta ची व्यवसाय टूल वापरणार्या मेसेजिंग व्यवसायांसह चॅट करण्याचा समावेश आहे. ऐच्छिक वैशिष्ट्ये नेहमी ॲपमध्ये स्पष्टपणे समजावून सांगितली जातात त्यामुळे तुमच्यासाठी योग्य असलेली निवड तुम्ही करू शकता.
खाती केंद्रात WhatsApp जोडल्यामुळे Meta माझी माहिती वापरते किंवा नाही यास प्रभावित करते का जेव्हा मी एखाद्या व्यवसायाला मेसेज करेन किंवा माझी वैयक्तिक माहिती त्यांच्यासोबत शेअर करेन?
समान खाती केंद्रात तुमची खाती असल्यामुळे तुमची माहिती वापरली जाते किंवा नाही यावर प्रभाव पडत नाही जर तुम्ही ती व्यवसायांसोबत शेअर करण्याची निवड केली असेल किंवा तुम्ही आमच्या प्रॉडक्टवर त्यांना मेसेज केला असेल.
Meta तुमची माहिती समान खाती केंद्रातील तुमच्या खात्यांवर कशी वापरते याबद्दल अधिक जाणून घ्या.
माझ्या कोणत्या सेटिंग्ज बदलतील?
तुमचे WhatsApp खाते खाती केंद्रात जोडल्यामुळे तुम्हाला तुमच्या WhatsApp खात्यांसाठीआणि त्याच खाती केंद्रात असलेल्या तुमच्या इतर कोणत्याही खात्यांसाठी विशिष्ट सेटिंग्ज एकाच ठिकाणी व्यवस्थापित करता येतील. यात खात्यांवरील तुमची प्रोफाईल माहिती ॲडजस्ट करणे आणि तुमच्या ॲपवर नेहमी स्टेटस क्रॉस-पोस्ट करावे की नाही यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. खाती केंद्राद्वारे नियंत्रण केल्या जाणार्या संपूर्ण सेटिंग्जच्या लिस्टसाठी, येथे अधिक वाचा.
मी माझे WhatsApp खाते खाती केंद्रात जोडू इच्छित नसल्यास काय होईल?
तुम्हाला तसे करण्याची गरज नाही. तुमचे WhatsApp खाते खाती केंद्र यामध्ये जोडणे पूर्णपणे ऐच्छिक आहे. तुम्ही तुमच्या Facebook किंवा Instagramखात्यांप्रमाणे तुमचे WhatsApp खाते समान खाती केंद्रात जोडण्याची निवड केली नसल्यास, तुम्ही अद्यापही WhatsApp जसे नेहमी वापरता तसेच वापरू शकता.
मी माझे WhatsApp खाते खाती केंद्रात जोडले आणि नंतर माझा विचार बदलला तर काय होईल?
तुम्ही तुमचे WhatsApp खाते खाती केंद्र यामध्ये जोडल्यास, तुम्ही आम्हाला भिन्न Meta कंपनी प्रॉडक्ट वरील खाती केंद्रातील खात्यांमधील तुमची माहिती एकत्रित करण्याची आणि वापरण्याची अनुमती देता. तुम्ही तुमचे WhatsApp खाते खाती केंद्र यामधून कधीही काढू शकता.
तुम्ही खाती केंद्रामधून तुमचे WhatsApp खाते काढल्यास, आम्ही 7 दिवसांमध्ये तुमचे WhatsApp खाते आणि तुमच्या खाती केंद्रामधील इतर खाती यांच्यामधील तुमची माहिती एकत्रित करणे अद्यापही थांबवू. तुम्ही तुमचे WhatsApp खाते काढल्यास, तुमची यापूर्वी एकत्रित केलेली माहिती एकत्रित केलेली राहील.
मी 2016 मध्ये, माझी WhatsApp खाते माहिती Meta सोबत शेअर करण्याची निवड रद्द केली. माझे WhatsApp खाते खाती केंद्रात जोडण्यामुळे माझ्यावर कसा प्रभाव पडेल?
तुम्ही 2016 मध्ये Meta जाहिराती आणि प्रॉडक्ट अनुभव सुधारण्यासाठी तुमची WhatsApp खाते माहिती Meta सोबत शेअर करण्याची निवड रद्द केली असल्यास, तुमचे WhatsApp खाते खाती केंद्र यामध्ये जोडण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही हे शेअर करण्याची आणि खाती केंद्रासह संबंधित सर्व शेअरिंगची निवड वर वर्णन केल्यानुसार करत आहात.