Meta AI आणि Vibes वर स्वतःच्या किंवा इतरांच्या इमेज आणि व्हिडिओ कसे तयार करावेत
तुम्ही Meta AI आणि Vibes ॲपवर स्वतःच्या किंवा इतरांच्या इमेज किंवा व्हिडिओ तयार करू शकता.
सुरुवात करण्यासाठी:
- स्वतःच्या AI इमेज आणि व्हिडिओ तयार करण्यासाठी, स्वतःचे फोटो घ्या आणि अपलोड करा. तुम्ही इतरांना तुम्हाला इमेज आणि व्हिडिओमध्ये जोडण्याची परवानगीदेखील देऊ शकता.
- इमेज किंवा व्हिडिओमध्ये तुमच्या मित्रांना जोडण्यासाठी त्यांच्या परवानगीची विनंती करा. तुमच्या सामाईक मित्रांच्या सेटिंग्जनुसार, तुम्हाला कदाचित आधीच त्यांच्या इमेज आणि व्हिडिओ तयार करता येत असतील.
स्वतःच्या AI इमेज आणि व्हिडिओ तयार करायला सुरुवात कशी करावी
स्वतःच्या इमेज आणि व्हिडिओ तयार करण्यासाठी, तुम्हाला Meta AI किंवा Vibes ॲपमध्ये तुमचे स्वतःचे फोटो जोडावे लागतील. तुम्ही इतरांनाही तुमच्या इमेज किंवा व्हिडिओ तयार करू देण्याचा पर्याय निवडू शकता.
सुरुवात करण्यासाठी:
- Meta AI ॲपमध्ये,
मेनू यावर टॅप करा.
- तळाशी असलेल्या तुमच्या प्रोफाइल पिक्चरवर टॅप करा.
- तुमची प्रतिमा यावर टॅप करा, त्यानंतर सुरुवात करा.
- पुढे तुम्हाला विचारले जाईल:
- परवानग्यांना अनुमती देण्यासाठी.
- ॲप वापरून तुमचा स्वतःचा फोटो काढण्यासाठी.
- किंवा तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
- स्वतःचे अतिरिक्त 3 फोटो अपलोड करणे. यामुळे आम्हाला तुमच्या AI इमेजमध्ये सुधारणा करण्यास मदत होते.
- तुमचा आवाज रेकॉर्ड करा, जेणेकरून तो व्हिडिओमध्ये जोडता येईल.
- तुम्हाला तुमच्या प्रतिमेमध्ये अतिरिक्त इमेज किंवा तुमचा आवाज जोडायचा नसल्यास, तुम्ही वगळा यावर टॅप करू शकता.
- तुमच्या इमेज कोण वापरू शकते हे निवडण्यासाठी टॅप करा:
- केवळ मी: केवळ तुम्ही स्वतःच्या इमेज आणि व्हिडिओ तयार करू शकता.
- मी मंजुरी दिलेले फॉलोअर: तुम्हाला मीडियामध्ये जोडू शकणारे विशिष्ट फॉलोअर निवडा. तुम्ही दोघेही एकमेकांना आधीपासूनच फॉलो करत असणे आवश्यक आहे.
- मी ज्यांना फॉलो करत आहे असे फॉलोअर: तुम्ही ज्यांना फॉलो करता, अशी कोणतीही व्यक्ती तुम्हाला इमेज आणि व्हिडिओमध्ये जोडू शकते, पण तुम्हीही त्यांना फॉलो करत असणे आवश्यक आहे.
- प्रत्येकजण: Meta AI किंवा Vibes ॲपवरील कोणीही तुमच्या इमेज आणि व्हिडिओ तयार करू शकते.
- पूर्ण झाले यावर टॅप करा.
नोट: तुमचे वय किंवा देश यानुसार तुम्हाला सर्व पर्याय कदाचित दिसणार नाहीत.
तुम्ही समाविष्ट असलेला मीडिया पाहणे आणि व्यवस्थापित करणे हे कसे करावे याबद्दल जाणून घ्या.
Meta AI आणि Vibes मधून तुमचे फोटो आणि आवाज कसे संपादित करावे किंवा हटवावे
- Meta AI ॲपमध्ये,
मेनू. यावर टॅप करा.
- तळाशी उजवीकडे असलेल्या तुमच्या प्रोफाइल पिक्चरवर टॅप करा.
- तुमची प्रतिमा यावर टॅप करा. येथून तुम्ही हे करू शकता:
- फोटो पुन्हा घ्या:फोटो पुन्हा घ्या > फोटो घ्या यावर टॅप करा.
- तुमचे संदर्भ फोटो बदला:फोटो अपलोड करा > फोटो रिप्लेस करा यावर टॅप करा.
- तुमचा आवाज पुन्हा रेकॉर्ड करा: आवाज पुन्हा रेकॉर्ड करा > आवाज रेकॉर्ड करा यावर टॅप करा.
- तुमची प्रतिमा हटवा: खाली स्क्रोल करा आणि नंतर हटवा यावर टॅप करा. यामुळे ऑनबोर्डिंग दरम्यान तुम्ही काढलेला फोटो आणि रेकॉर्डिंग केलेला आवाज हटवला जातो.
नोट: Vibes ॲपमध्ये तुम्ही तुमच्या प्रतिमेमध्ये केलेले कोणतेही बदल Meta AI ॲपमध्येही लागू होतील.
तुम्ही तुमची प्रतिमा हटवण्याचा पर्याय निवडला, तरीही ज्या व्हाइबमध्ये तुम्ही समाविष्ट आहात, त्या मात्र दृश्यमान राहतील. तुम्ही हे “माझा समावेश असणारा मीडिया” यामधून हटवू शकता. तुम्ही समाविष्ट असलेला मीडिया हटवणे हे कसे करावे याबद्दल अधिक जाणून घ्या.
AI द्वारे जनरेट केलेल्या इमेज किंवा व्हिडिओमध्ये व्यक्तींना जोडण्याची विनंती कशी करावी
इमेज आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला कोण जोडू शकते हे लोक निवडू शकतात, केवळ तुम्ही स्वतः, तुमचे म्युच्युअल फॉलोअर किंवा Meta AI अथवा Vibes ॲप वापरणारी कोणतीही व्यक्ती. तुम्ही एखाद्याला इमेज किंवा व्हिडिओमध्ये जोडण्यासाठी विनंतीदेखील पाठवू शकता.
Meta AI आणि Vibes वर लोकांना तुम्हाला मीडियामध्ये जोडण्याची परवानगी कशी द्यावी
कोणालाही तुमच्या इमेज किंवा व्हिडिओ तयार करण्यासाठी, त्यांना तुमच्या परवानगीची आवश्यकता असेल. तुमच्या परवानग्यांची सेटिंग्ज बदलण्यासाठी:
- Meta AI ॲपमध्ये,
मेनू यावर टॅप करा.
- तळाशी उजवीकडे असलेल्या तुमच्या प्रोफाइल पिक्चरवर टॅप करा.
- तुमची प्रतिमा यावर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला मीडियामध्ये कोण जोडू शकते ते निवडा:
- केवळ मी: केवळ तुम्हीच तुमच्या स्वतःच्या इमेज आणि व्हिडिओ तयार करू शकता.
- मी मंजुरी दिलेले फॉलोअर: तुम्हाला मीडियामध्ये जोडू शकणारे विशिष्ट फॉलोअर निवडा. तुम्ही दोघे एकमेकांना आधीपासून फॉलो करत असणे आवश्यक आहे.
- मी ज्यांना फॉलो करत आहे असे फॉलोअर: तुम्ही ज्यांना फॉलो करता, अशी कोणतीही व्यक्ती तुम्हाला मीडियामध्ये जोडू शकते, पण तुम्हीही त्यांना फॉलो करत असणे आवश्यक आहे.
- प्रत्येकजण: Meta AI किंवा Vibes ॲपवरील कोणीही तुमच्या इमेज आणि व्हिडिओ तयार करू शकते.
नोट: तुमचे वय किंवा देश यानुसार तुम्हाला सर्व पर्याय कदाचित दिसणार नाहीत.
कोणी तुमच्या प्रतिमेचा वापर केल्यास, तुम्हाला सूचित केले जाईल. Meta AI आणि Vibes वरील तुमच्या नोटिफिकेशन बदलणे हे कसे करावे याबद्दल जाणून घ्या. एखाद्या व्यक्तीने तुमचा समावेश असलेली इमेज किंवा व्हिडिओ तयार केल्यास, तुम्ही तो हटवण्याचा पर्याय निवडू शकता. तुम्ही समाविष्ट असलेला मीडिया हटवणे हे कसे करावे याबद्दल अधिक जाणून घ्या.
नोट्स:
- तुम्ही तुमच्या परवानग्या कधीही बदलू शकता.
- तुमच्या परवानग्या Meta AI आणि Vibes या दोन्ही ॲपना लागू होतात.
- तुम्ही एखाद्याला अनफॉलो किंवा ब्लॉक करण्याचे निवडले, तर ते यापुढे तुमचा समावेश असलेली नवीन इमेज किंवा व्हिडिओ तयार करू शकणार नाहीत. त्यांनी यापूर्वी तयार केलेला कोणताही मीडिया तसाच राहील, पण तुम्ही अजूनही तो हटवणे हे करू शकता.
Meta AI आणि Vibes वर लोकांना मीडियामध्ये जोडण्यास कसे सांगावे
व्हाइब रीमिक्स करत असताना, त्यामध्ये एखाद्याला जोडण्याची विनंती करण्यासाठी:
- जोडा यावर टॅप करा.
- विनंती करा यावर टॅप करा. तुम्हाला तुमचे मित्र Meta AI आणि Vibes ॲपवर, तसेच Instagram वर दिसतील.
- त्यांच्या नावाशेजारील विनंती करा यावर टॅप करा.
तुम्ही एखाद्याला विनंती पाठवता, तेव्हा:
- Meta AI आणि Vibes वर तुम्ही तयार करत असलेल्या इमेज व व्हिडिओमध्ये त्यांना जोडण्याची तुमची इच्छा आहे, याबाबत त्यांना सूचित केले जाईल.
- त्यांनी अद्याप Meta AI किंवा Vibes ॲप डाउनलोड केले नसल्यास, त्यांना ते डाउनलोड करण्यासाठी आमंत्रित केले जाईल.
- त्यांनी अद्याप प्रतिमा तयार केली नसल्यास, त्यांना तसे करण्यास सांगितले जाईल.
त्यांनी तुमची विनंती स्वीकारल्यास, तुम्हाला सूचित केले जाईल व त्यानंतर तुम्ही त्यांच्या इमेज आणि व्हिडिओ तयार करण्यास सुरुवात करू शकता. Meta AI आणि Vibes वरील तुमच्या नोटिफिकेशन बदलणे हे कसे करावे ते जाणून घ्या.
लोकांचा समावेश असलेल्या इमेज आणि व्हिडिओ कसे तयार करावेत
तुम्ही एखाद्या विद्यमान व्हाइबचे रीमिक्स करून स्वतःला किंवा इतरांना त्यामध्ये जोडू शकता; अथवा स्वतःच्या किंवा इतरांच्या नवीन इमेज किंवा व्हिडिओ तयार करू शकता.
स्वतःच्या इमेज आणि व्हिडिओ तयार करा
विद्यमान व्हाइब रीमिक्स करण्यासाठी आणि स्वतःला जोडण्यासाठी:
- ज्यामध्ये माणसे असतील, अशी व्हाइब निवडा.
- तुम्ही रीमिक्स करू इच्छित असलेल्या पोस्टवरील
रीमिक्स करा यावर टॅप करा.
- जोडा यावर टॅप करा.
- तुमच्या फोटोवर टॅप करा.
व्हाइब रीमिक्स करणे याबद्दल अधिक जाणून घ्या.
तुम्हाला नवीन इमेज किंवा व्हिडिओमध्ये जोडण्यासाठी:
- Meta AI ॲप उघडा.
- सर्वात वरती उजवीकडे
तयार करा यावर टॅप करा.
- तुमचा प्रॉम्प्ट इमेज किंवा व्हिडिओचे वर्णन करा… या बॉक्समध्ये टाइप करा आणि तुमच्या प्रॉम्प्टचा भाग म्हणून “मी” किंवा “माझा” हे शब्द समाविष्ट करा. उदाहरणार्थ, "मला अंतराळवीर म्हणून दाखवणारा एक व्हिडिओ तयार करा."
- यावर टॅप करा:
पाठवा.
Meta AI आणि Vibes वापरून इमेज व व्हिडिओ जनरेट करणे याबद्दल अधिक जाणून घ्या.
दुसऱ्या कोणाचातरी फोटो आणि व्हिडिओ तयार करणे
विद्यमान व्हाइब रीमिक्स करण्यासाठी:
- ज्यामध्ये माणसे असतील, अशी व्हाइब निवडा.
- तुम्ही रीमिक्स करू इच्छिता त्या पोस्टवरील
रीमिक्स करा यावर टॅप करा.
- जोडा यावर टॅप करा.
- तुम्हाला ज्या व्यक्तीला जोडायचे आहे, तिच्या नावावर टॅप करा. तुम्ही एका वेळी एका व्यक्तीला (स्वतःच्या समावेशासह) जोडू शकता.
व्हाइब रीमिक्स करणे याबद्दल अधिक जाणून घ्या.
नवीन इमेज किंवा व्हिडिओमध्ये लोकांना जोडण्यासाठी:
- Meta AI ॲप उघडा.
- सर्वात वरती उजवीकडे असलेल्या
तयार करा यावर टॅप करा.
- तुमचा प्रॉम्प्ट इमेज किंवा व्हिडिओचे वर्णन करा… या बॉक्समध्ये टाइप करा आणि त्या व्यक्तीला इमेज अथवा व्हिडिओमध्ये समाविष्ट करण्यासाठी "@" आणि त्यानंतर त्या व्यक्तीचे युझरनेम जोडा. तुम्ही एका वेळी जास्तीत जास्त दोन व्यक्तींना (स्वतःच्या समावेशासह) जोडू शकता.
- यावर टॅप करा:
पाठवा.
Meta AI आणि Vibes वापरून इमेज व व्हिडिओ जनरेट करणे याबद्दल अधिक जाणून घ्या.
तुम्ही एखाद्या व्यक्तीचा समावेश असलेली व्हाइब पोस्ट केली, तर त्यांना सूचित केले जाईल.
तुम्ही तयार केलेल्या व्हाइब आणि ड्राफ्ट, (तुम्ही अद्याप पोस्ट न केलेल्या ड्राफ्टच्या समावेशासह), त्यामध्ये वैशिष्ट्यीकृत केलेल्या व्यक्तीला पाहता येतात आणि हटवता येतात:
- तुम्ही व्हाइबमध्ये वैशिष्ट्यीकृत करता ती व्यक्ती, त्यांचा समावेश असलेल्या तुमच्या सार्वजनिक व्हाइब किंवा ड्राफ्ट हटवण्याचा पर्याय निवडू शकते. सार्वजनिक व्हाइबच्या बाबतीत एखादी गोष्ट हटवली जाईल, तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.
- ड्राफ्ट हटवले गेल्यास तुम्हाला सूचित केले जाणार नाही. ड्राफ्ट दिसत नसल्याचे तुमच्या लक्षात आल्यास, तो तुम्ही वैशिष्ट्यीकृत केलेल्या व्यक्तीकडून कदाचित हटवला गेला असू शकतो.
तुमचा समावेश असलेल्या इतरांच्या व्हाइब कशा हटवायच्या
- Meta AI ॲपमध्ये,
मेनू यावर टॅप करा.
- तळाशी असलेल्या तुमच्या प्रोफाइल पिक्चरवर टॅप करा.
- तुमची प्रतिमा यावर, त्यानंतर माझा समावेश असलेला मीडिया यावर टॅप करा.
- Vibes:
पर्याय यावर टॅप करा, त्यानंतर हटवा यावर टॅप करा.
- ड्राफ्ट: ड्राफ्टवर टॅप करा, त्यानंतर हटवा यावर टॅप करा.
एखादी व्यक्ती Meta AI किंवा Vibes ॲपमधील 'जोडा' फीचरचा वापर करून तुम्ही समाविष्ट असलेली एखादी व्हाइब' तयार करेल आणि पोस्ट करेल, तेव्हा तुम्हाला सूचित केले जाईल. तुम्ही स्वतःचा समावेश असलेल्या सार्वजनिक व्हाइब किंवा ड्राफ्ट हटवणे कधीही निवडू शकता. तुम्ही सार्वजनिक व्हाइब हटवता, तेव्हा ती तयार करणाऱ्या व्यक्तीला याबाबत सूचित केले जाईल. तुम्ही एखादा ड्राफ्ट हटवता, तेव्हा तो तयार करणाऱ्या व्यक्तीला याबाबत सूचित केले जाणार नाही.
नोट:
- इतर चॅटप्रमाणे, AI सोबतच्या इंटरॅक्शन आमच्या कम्युनिटी स्टँडर्ड आणि सेवा अटी यांच्या अधीन असतात.
- AI चा प्रतिसाद चुकीचा किंवा अनुचित असू शकतो आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी त्याचा वापर करू नये.
- Meta हे Meta येथील AI मध्ये सुधारणा करण्यासाठी AI सोबतच्या तुमच्या इंटरॅक्शनचा वापर करते. AI तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाहीत, तर तुम्हाला अधिक चांगले परिणाम मिळवता यावेत यासाठी, Meta तुम्ही AI ला पाठवलेले मेसेज आणि तुमच्या प्रदेशासारखी सामान्य माहिती निवडक भागीदारांसोबत शेअर करते. अधिक जाणून घेण्यासाठी आमच्या Meta AI सेवा अटी वर जा.
- Meta AI तुम्हाला अधिक समर्पक प्रतिसाद देण्यासाठी तुमची लोकेशन माहिती वापरते. तुमची लोकेशन माहिती ही तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर निवडलेली सेटिंग्ज किंवा आमच्या प्रॉडक्टवरील तुमची अॅक्टिव्हिटी यांसारख्या गोष्टींवर आधारित असते. गोपनीयता केंद्र यामध्ये तुमचे लोकेशन कसे व्यवस्थापित करावे याबद्दल अधिक जाणून घ्या.
- तुमच्या प्रोफाइलमधील इतर माहिती, जसे की तुमचे वय आणि लिंग, तसेच आमच्या विविध प्रॉडक्टवरील तुमची अॅक्टिव्हिटी, म्हणजे जाहिरातींसोबतच तुम्ही कोणत्या प्रकारचा कंटेन्ट पाहता किंवा इंटरॅक्ट करता व कशाप्रकारे इंटरॅक्ट करता, यावर आधारित तुमच्या स्वारस्यांचा वापर AI सह असलेल्या तुमच्या इंटरॅक्शन वैयक्तिकृत करण्यासाठी केला जाईल. Meta या माहितीचा वापर कसा करते याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी गोपनीयता केंद्र वर जा. तुम्ही त्याच खाती केंद्रामध्ये तुमच्या खात्यांवर माहितीचा वापर कसा केला जातो हेदेखील पाहू शकता आणि तुमची माहिती एक्सपोर्ट करू शकता. तुमच्या माहितीची प्रत एक्सपोर्ट करणे हे कसे करायचे ते जाणून घ्या.
- तुमच्या प्रॉम्प्टवर आधारित, जनरेट केलेला कंटेन्ट आमच्या कम्युनिटी स्टँडर्डचे किंवा Meta च्या प्लॅटफॉर्म सेवा अटींचे उल्लंघन करणारा असू शकतो. आमच्या प्लॅटफॉर्मवर, या स्टँडर्डचे उल्लंघन करणारा AI-जनरेटेड कंटेन्ट शेअर करण्याला, आमच्या स्टँडर्डचे उल्लंघन करणारा इतर कोणताही कंटेन्ट शेअर करण्याप्रमाणेच समजले जाईल. तुम्ही आमच्या स्टँडर्डचे उल्लंघन करणारा जनरेट केलेला शेअर केल्यास, तुमचा कंटेन्ट काढला जाऊ शकतो आणि तुमचे खाते प्रतिबंधित किंवा अक्षम केले जाऊ शकते. कम्युनिटी स्टँडर्ड आणि सेवा अटी यांबद्दल अधिक जाणून घ्या:
- तुमच्या प्रदेशानुसार, AI प्रॉडक्टशी तुम्ही केलेल्या इंटरॅक्शनचा वापर कंटेन्ट आणि जाहिराती वैयक्तिकृत करण्यासाठी केला जाऊ शकतो.
Meta जनरेटिव्ह AI मॉडेलसाठी माहितीचा वापर कसा करते, याबद्दल अधिक जाणून घ्या.
सुरुवात करण्यासाठी:
- स्वतःच्या AI इमेज आणि व्हिडिओ तयार करण्यासाठी, स्वतःचे फोटो घ्या आणि अपलोड करा. तुम्ही इतरांनादेखील तुम्हाला इमेज आणि व्हिडिओमध्ये जोडण्याची परवानगी देऊ शकता.
- इमेज किंवा व्हिडिओमध्ये तुमच्या मित्रांना जोडण्यासाठी त्यांच्या परवानगीची विनंती करा. त्यांच्या सेटिंग्जनुसार, तुम्हाला कदाचित आधीच सामाईक मित्रांचे फोटो आणि व्हिडिओ तयार करता येत असतील.
स्वतःच्या AI इमेज आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात कशी करावी
स्वतःच्या इमेज आणि व्हिडिओ तयार करण्यासाठी, तुम्हाला Vibes ॲपमध्ये तुमचे स्वतःचे फोटो जोडावे लागतील. तुम्ही इतरांनाही तुमचे इमेज किंवा व्हिडिओ तयार करू देण्याचा पर्याय निवडू शकता.
सुरुवात करण्यासाठी:
- Vibes ॲपमध्ये,
तळाशी असलेल्या प्रोफाइल यावर टॅप करा.
- यावर टॅप करा:
सेटिंग्ज.
- तुमची प्रतिमा यावर टॅप करा, त्यानंतर सुरुवात करा.
- पुढे तुम्हाला विचारले जाईल:
- परवानग्यांना अनुमती देण्यासाठी.
- ॲप वापरून तुमचा स्वतःचा फोटो काढण्यासाठी.
- किंवा तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
- तुमचे स्वतःचे अतिरिक्त 3 फोटो अपलोड करणे. यामुळे आम्हाला तुमच्या AI इमेजमध्ये सुधारणा करण्यास मदत होते.
- तुमचा आवाज रेकॉर्ड करा, जेणेकरून तो व्हिडिओमध्ये जोडता येईल.
- तुम्हाला तुमच्या प्रतिमेमध्ये अतिरिक्त इमेज किंवा तुमचा आवाज जोडायचा नसल्यास, तुम्ही वगळा यावर टॅप करू शकता.
- तुमची इमेज कोण वापरू शकते हे निवडण्यासाठी टॅप करा:
- केवळ मी: केवळ तुम्हीच तुमच्या स्वतःच्या इमेज आणि व्हिडिओ तयार करू शकता.
- मी मंजुरी दिलेले फॉलोअर: तुम्हाला मीडियामध्ये जोडू शकणारे विशिष्ट फॉलोअर निवडा. तुम्ही दोघे एकमेकांना आधीपासून फॉलो करत असणे आवश्यक आहे.
- मी ज्यांना फॉलो करत आहे असे फॉलोअर: तुम्ही ज्यांना फॉलो करता, अशी कोणतीही व्यक्ती तुम्हाला इमेज आणि व्हिडिओमध्ये जोडू शकते, पण तुम्हीही त्यांना फॉलो करत असणे आवश्यक आहे.
- प्रत्येकजण: Meta AI किंवा Vibes ॲपवरील कोणीही तुमच्या इमेज आणि व्हिडिओ तयार करू शकते.
- पूर्ण झाले यावर टॅप करा.
नोट: तुमचे वय किंवा देश यानुसार तुम्हाला सर्व पर्याय कदाचित दिसणार नाहीत.
तुम्ही समाविष्ट असलेला मीडिया पाहणे आणि व्यवस्थापित करणे हे कसे करावे याबद्दल जाणून घ्या.
Meta AI आणि Vibes मधून तुमचा फोटो आणि आवाज कसे संपादित करावे किंवा हटवावे
- Vibes ॲपमध्ये,
तळाशी असलेल्या प्रोफाइल यावर टॅप करा.
- यावर टॅप करा:
सेटिंग्ज.
- तुमची प्रतिमा यावर टॅप करा. येथून तुम्ही हे करू शकता:
- फोटो पुन्हा घ्या:फोटो पुन्हा घ्या > फोटो घ्या यावर टॅप करा.
- तुमचे संदर्भ फोटो बदला:फोटो अपलोड करा > फोटो बदला यावर टॅप करा.
- तुमचा आवाज पुन्हा रेकॉर्ड करा: आवाज पुन्हा रेकॉर्ड करा > आवाज रेकॉर्ड करा यावर टॅप करा.
- तुमची प्रतिमा हटवा: खाली स्क्रोल करा आणि नंतर हटवा यावर टॅप करा. यामुळे ऑनबोर्डिंग दरम्यान तुम्ही काढलेला फोटो आणि रेकॉर्डिंग केलेला आवाज हटवला जातो.
नोट: Vibes ॲपमध्ये तुम्ही तुमच्या प्रतिमेमध्ये केलेले कोणतेही बदल Meta AI ॲपमध्येही लागू होतील.
तुम्ही तुमची प्रतिमा हटवण्याचा पर्याय निवडला, तरीही ज्या व्हाइबमध्ये तुम्ही समाविष्ट आहात, त्या मात्र दृश्यमान राहतील. तुम्ही हे “माझा समावेश असणारा मीडिया” यामधून हटवू शकता. तुम्ही समाविष्ट असलेला मीडिया हटवणे याबद्दल अधिक जाणून घ्या.
AI द्वारे जनरेट केलेल्या इमेज किंवा व्हिडिओमध्ये व्यक्तींना जोडण्याची विनंती कशी करावी
इमेज आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला कोण जोडू शकते हे लोक निवडू शकतात, केवळ तुम्ही स्वतः, तुमचे म्युच्युअल फॉलोअर किंवा Meta AI अथवा Vibes ॲप वापरणारी कोणतीही व्यक्ती. तुम्ही एखाद्या व्यक्तीला इमेज किंवा व्हिडिओमध्ये जोडण्यासाठी विनंतीदेखील पाठवू शकता.
Meta AI आणि Vibes वर लोकांना तुम्हाला मीडियामध्ये जोडण्याची परवानगी कशी द्यावी
कोणालाही तुमच्या इमेज किंवा व्हिडिओ तयार करण्यासाठी, त्यांना तुमच्या परवानगीची आवश्यकता असेल. तुमच्या परवानग्यांची सेटिंग्ज बदलण्यासाठी:
- Vibes ॲपमध्ये,
तळाशी असलेल्या प्रोफाइल यावर टॅप करा.
- यावर टॅप करा:
सेटिंग्ज.
- तुमची प्रतिमा यावर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला मीडियामध्ये कोण जोडू शकते ते निवडा:
- केवळ मी: केवळ तुम्हीच स्वतःच्या इमेज आणि व्हिडिओ तयार करू शकता.
- मी मंजुरी दिलेले फॉलोअर: तुम्हाला मीडियामध्ये जोडू शकणारे विशिष्ट फॉलोअर निवडा. तुम्ही दोघे एकमेकांना आधीपासून फॉलो करत असणे आवश्यक आहे.
- मी ज्यांना फॉलो करत आहे असे फॉलोअर: तुम्ही ज्यांना फॉलो करता, अशी कोणतीही व्यक्ती तुम्हाला मीडियामध्ये जोडू शकते, पण तुम्हीही त्यांना फॉलो करत असणे आवश्यक आहे.
- प्रत्येकजण: Meta AI आणि Vibes ॲपवरील कोणीही तुमच्या इमेज व व्हिडिओ तयार करू शकते.
नोट: तुमचे वय किंवा देश यानुसार तुम्हाला सर्व पर्याय कदाचित दिसणार नाहीत.
एखाद्या व्यक्तीने तुमच्या प्रतिमेचा वापर केल्यास, तुम्हाला सूचित केले जाईल. Meta AI आणि Vibes वरील तुमची नोटिफिकेशन बदलणे हे कसे करावे ते जाणून घ्या. एखाद्या व्यक्तीने तुमचा समावेश असलेली इमेज किंवा व्हिडिओ तयार केल्यास, तो हटवण्याचा पर्याय निवडू शकता. तुम्ही समाविष्ट असलेला मीडिया हटवणे हे कसे करावे याबद्दल अधिक जाणून घ्या.
नोट्स:
- तुम्ही तुमच्या परवानग्या कधीही बदलू शकता.
- तुमच्या परवानग्या Meta AI आणि Vibes या दोन्ही ॲपना लागू होतात.
- तुम्ही एखाद्याला अनफॉलो किंवा ब्लॉक करण्याचे निवडले, तर ते यापुढे तुमचा समावेश असलेली नवीन इमेज किंवा व्हिडिओ तयार करू शकणार नाहीत. त्यांनी यापूर्वी तयार केलेला कोणताही मीडिया तसाच राहील, पण तुम्ही अजूनही तो हटवणे हे करू शकता.
Meta AI आणि Vibes वर लोकांना मीडियामध्ये जोडण्यास कसे सांगावे
व्हाइब रीमिक्स करत असताना, त्यामध्ये एखाद्याला जोडण्याची विनंती करण्यासाठी:
- जोडा यावर टॅप करा.
- विनंती करा यावर टॅप करा. तुम्हाला तुमचे मित्र Meta AI आणि Vibes ॲपवर, तसेच Instagram वर दिसतील.
- त्यांच्या नावाशेजारील विनंती करा यावर टॅप करा.
तुम्ही एखाद्याला विनंती पाठवता, तेव्हा:
- Meta AI आणि Vibes वर तुम्ही तयार करत असलेल्या इमेज व व्हिडिओमध्ये त्यांना जोडण्याची तुमची इच्छा आहे, याबाबत त्यांना सूचित केले जाईल.
- त्यांनी अद्याप Meta AI किंवा Vibes ॲप डाउनलोड केले नसल्यास, त्यांना ते डाउनलोड करण्यासाठी आमंत्रित केले जाईल.
- त्यांनी अद्याप प्रतिमा तयार केली नसल्यास, त्यांना तसे करण्यास सांगितले जाईल.
त्यांनी तुमची विनंती स्वीकारल्यास, तुम्हाला सूचित केले जाईल व त्यानंतर तुम्ही त्यांच्या इमेज आणि व्हिडिओ तयार करण्यास सुरुवात करू शकता. Meta AI ॲपवरील तुमच्या नोटिफिकेशन बदलणे हे कसे करावे ते जाणून घ्या.
लोकांचा समावेश असलेल्या इमेज आणि व्हिडिओ कसे तयार करावे
तुम्ही एखाद्या विद्यमान व्हाइबचे रीमिक्स करून स्वतःला किंवा इतरांना त्यामध्ये जोडू शकता; अथवा स्वतःच्या किंवा इतरांच्या नवीन इमेज किंवा व्हिडिओ तयार करू शकता.
स्वतःच्या इमेज आणि व्हिडिओ तयार करा
विद्यमान व्हाइब रीमिक्स करण्यासाठी आणि स्वतःला जोडण्यासाठी:
- ज्यामध्ये माणसे असतील, अशी व्हाइब निवडा.
- तुम्ही रीमिक्स करू इच्छिता त्या पोस्टवरील
रीमिक्स करा यावर टॅप करा.
- जोडा यावर टॅप करा.
- तुमच्या फोटोवर टॅप करा.
व्हाइब रीमिक्स करणे याबाबत अधिक जाणून घ्या.
तुम्हाला नवीन इमेज किंवा व्हिडिओमध्ये जोडण्यासाठी:
- Vibes ॲप उघडा.
- टॅप करा;
तयार करायावर
- तुमचा प्रॉम्प्ट इमेज किंवा व्हिडिओचे वर्णन करा… या बॉक्समध्ये टाइप करा आणि तुमच्या प्रॉम्प्टचा भाग म्हणून “मी” किंवा “माझा” हे शब्द समाविष्ट करा. उदाहरणार्थ, "मला अंतराळवीर म्हणून दाखवणारा एक व्हिडिओ तयार करा."
- टॅप करा;
पाठवा यावर.
Meta AI आणि Vibes वापरून इमेज व व्हिडिओ जनरेट करणे याबद्दल अधिक जाणून घ्या.
अन्य एखाद्या व्यक्तीच्या इमेज आणि व्हिडिओ तयार करणे
विद्यमान व्हाइब रीमिक्स करण्यासाठी:
- ज्यामध्ये माणसे असतील, अशी व्हाइब निवडा.
- तुम्ही रीमिक्स करू इच्छित असलेल्या पोस्टवरील
रीमिक्स करा यावर टॅप करा.
- जोडा. यावर टॅप करा
- तुम्हाला जोडायचे आहे अशा व्यक्तीच्या नावावर टॅप करा. तुम्ही एका वेळी एका व्यक्तीला (स्वतःच्या समावेशासह) जोडू शकता.
व्हाइब रीमिक्स करणे याबाबत अधिक जाणून घ्या.
नवीन इमेज किंवा व्हिडिओमध्ये लोकांना जोडण्यासाठी:
- Vibes ॲप उघडा.
- यावर टॅप करा;
तयार करा
- तुमचा प्रॉम्प्ट इमेज किंवा व्हिडिओचे वर्णन करा… या बॉक्समध्ये टाइप करा आणि त्या व्यक्तीला इमेज अथवा व्हिडिओमध्ये समाविष्ट करण्यासाठी "@" आणि त्यानंतर त्या व्यक्तीचे युझरनेम जोडा. तुम्ही एका वेळी जास्तीत जास्त दोन व्यक्तींना (स्वतःच्या समावेशासह) जोडू शकता.
- यावर टॅप करा
पाठवा.
Meta AI आणि Vibes वापरून इमेज व व्हिडिओ जनरेट करणे याबद्दल अधिक जाणून घ्या.
तुम्ही एखाद्या व्यक्तीचा समावेश असलेली व्हाइब पोस्ट केली, तर त्यांना सूचित केले जाईल.
तुम्ही तयार केलेल्या व्हाइब आणि ड्राफ्ट, (तुम्ही अद्याप पोस्ट न केलेले ड्राफ्टच्या समावेशासह), त्यामध्ये वैशिष्ट्यीकृत केलेल्या व्यक्तीला पाहता येतात आणि हटवता येतात:
- तुम्ही व्हाइबमध्ये वैशिष्ट्यीकृत करता ती व्यक्ती, त्यांचा समावेश असलेल्या तुमच्या सार्वजनिक व्हाइब किंवा ड्राफ्ट हटवण्याचा पर्याय निवडू शकते. सार्वजनिक व्हाइबच्या बाबतीत एखादी गोष्ट हटवली जाईल, तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.
- ड्राफ्ट हटवले गेल्यास तुम्हाला सूचित केले जाणार नाही. ड्राफ्ट दिसत नसल्याचे तुमच्या लक्षात आल्यास, तो तुम्ही वैशिष्ट्यीकृत केलेल्या व्यक्तीकडून कदाचित हटवला गेला असू शकतो.
तुमचा समावेश असलेल्या इतरांच्या व्हाइब कशा हटवायच्या
- Vibes ॲपमध्ये, टॅप करा
तळाशी असलेल्या प्रोफाइल यावर टॅप करा.
- यावर टॅप करा;
सेटिंग्ज.
- तुमची प्रतिमा यावर, त्यानंतर माझा समावेश असलेला मीडिया यावर टॅप करा.
- Vibes:
पर्याय यावर टॅप करा, त्यानंतर हटवा यावर टॅप करा.
- ड्राफ्ट: ड्राफ्टवर टॅप करा, त्यानंतर हटवा यावर टॅप करा.
एखादी व्यक्ती Meta AI किंवा Vibes ॲपमधील 'जोडा' फीचरचा वापर करून तुम्ही समाविष्ट असलेली एखादी व्हाइब' तयार करेल आणि पोस्ट करेल, तेव्हा तुम्हाला सूचित केले जाईल. तुम्ही स्वतःचा समावेश असलेल्या सार्वजनिक व्हाइब किंवा ड्राफ्ट हटवणे कधीही निवडू शकता. तुम्ही सार्वजनिक व्हाइब हटवता, तेव्हा ती तयार करणाऱ्या व्यक्तीला याबाबत सूचित केले जाईल. तुम्ही एखादा ड्राफ्ट हटवता, तेव्हा तो तयार करणाऱ्या व्यक्तीला याबाबत सूचित केले जाणार नाही.
नोट:
- इतर चॅटप्रमाणे, AI सोबतच्या इंटरॅक्शन आमच्या कम्युनिटी स्टँडर्ड आणि सेवा अटी यांच्या अधीन असतात.
- AI चा प्रतिसाद चुकीचा किंवा अनुचित असू शकतो आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी त्याचा वापर करू नये.
- Meta हे Meta येथील AI मध्ये सुधारणा करण्यासाठी AI सोबतच्या तुमच्या इंटरॅक्शनचा वापर करते. AI तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाहीत, तर तुम्हाला अधिक चांगले परिणाम मिळवता यावेत यासाठी, Meta तुम्ही AI ला पाठवलेले मेसेज आणि तुमच्या प्रदेशासारखी सामान्य माहिती निवडक भागीदारांसोबत शेअर करते. अधिक जाणून घेण्यासाठी आमच्या Meta AI सेवा अटी वर जा.
- Meta AI तुम्हाला अधिक समर्पक प्रतिसाद देण्यासाठी तुमची लोकेशन माहिती वापरते. तुमची लोकेशन माहिती ही तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर निवडलेली सेटिंग्ज किंवा आमच्या प्रॉडक्टवरील तुमची अॅक्टिव्हिटी यांसारख्या गोष्टींवर आधारित असते. गोपनीयता केंद्र यामध्ये तुमचे लोकेशन कसे व्यवस्थापित करावे याबद्दल अधिक जाणून घ्या.
- तुमच्या प्रोफाइलमधील इतर माहिती, जसे की तुमचे वय आणि लिंग, तसेच आमच्या विविध प्रॉडक्टवरील तुमची अॅक्टिव्हिटी, म्हणजे जाहिरातींसोबतच तुम्ही कोणत्या प्रकारचा कंटेन्ट पाहता किंवा इंटरॅक्ट करता व कशाप्रकारे इंटरॅक्ट करता, यावर आधारित तुमच्या स्वारस्यांचा वापर AI सह असलेल्या तुमच्या इंटरॅक्शन वैयक्तिकृत करण्यासाठी केला जाईल. Meta या माहितीचा वापर कसा करते याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी गोपनीयता केंद्र वर जा. तुम्ही त्याच खाती केंद्रामध्ये तुमच्या खात्यांवर माहितीचा वापर कसा केला जातो हेदेखील पाहू शकता आणि तुमची माहिती एक्सपोर्ट करू शकता. तुमच्या माहितीची प्रत एक्सपोर्ट करणे हे कसे करायचे ते जाणून घ्या.
- तुमच्या प्रॉम्प्टवर आधारित, जनरेट केलेला कंटेन्ट आमच्या कम्युनिटी स्टँडर्डचे किंवा Meta च्या प्लॅटफॉर्म सेवा अटींचे उल्लंघन करणारा असू शकतो. आमच्या प्लॅटफॉर्मवर, या स्टँडर्डचे उल्लंघन करणारा AI-जनरेटेड कंटेन्ट शेअर करण्याला, आमच्या स्टँडर्डचे उल्लंघन करणारा इतर कोणताही कंटेन्ट शेअर करण्याप्रमाणेच समजले जाईल. तुम्ही आमच्या स्टँडर्डचे उल्लंघन करणारा जनरेट केलेला शेअर केल्यास, तुमचा कंटेन्ट काढला जाऊ शकतो आणि तुमचे खाते प्रतिबंधित किंवा अक्षम केले जाऊ शकते. कम्युनिटी स्टँडर्ड आणि सेवा अटी यांबद्दल अधिक जाणून घ्या:
- तुमच्या प्रदेशानुसार, AI प्रॉडक्टशी तुम्ही केलेल्या इंटरॅक्शनचा वापर कंटेन्ट आणि जाहिराती वैयक्तिकृत करण्यासाठी केला जाऊ शकतो.
Meta जनरेटिव्ह AI मॉडेलसाठी माहितीचा वापर कसा करते, याबद्दल अधिक जाणून घ्या.
सध्या, स्वतःच्या किंवा इतरांच्या इमेज आणि व्हाइब तयार करण्यासाठी तुम्हाला Meta AI किंवा Vibes ॲप वापरावे लागेल. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला त्यांच्या व्हाइबमध्ये समाविष्ट करण्यासाठी 'जोडा' फीचरचा वापर केला, तर तुम्ही Meta AI किंवा Vibes ॲपवरून ते कधीही काढून टाकणे निवडू शकता. तुम्ही तुमचा समावेश असणाऱ्या सार्वजनिक व्हाइब किंवा ड्राफ्ट हटवू शकता.