Meta प्रॉडक्टवरील AI कंटेन्ट कशा प्रकारे ओळखावा

जाहिरातींसाठी AI कंटेन्ट लेबल करणे आणि ओळखणे वेगळे असते.

जनरेटिव्ह कृत्रिम बुद्धिमत्ता (जनरेटिव्ह AI) हे नवनवीन मार्गांनी इमेज आणि मजकूर यासारखा कंटेन्ट तयार करण्यात किंवा सुधारण्यात मदत करणारे एक टूल आहे.

जनरेटिव्ह AI कसे कार्य करते

जनरेटिव्ह AI मॉडेलना माहितीचे कोट्यवधी भाग वापरून प्रशिक्षित केले जाते. जनरेटिव्ह AI मॉडेल नवीन कंटेन्ट जनरेट करण्यासाठी प्रॉम्प्ट किंवा सूचनांच्या आधारे माहितीच्या या तुकड्यांमधील पॅटर्न आणि संबंधांबद्दल जाणून घेतात.

उदाहरणार्थ, तुम्ही जनरेटिव्ह AI टूलमध्ये फुलांच्या कुरणामधून धावणाऱ्या 3 तपकिरी कुत्र्यांची इमेज विचारणारी विनंती टाईप करू शकता. किंवा तुम्ही शेक्सपियर सारख्या ऐतिहासिक व्यक्तीच्या शैलीमध्ये लिहिलेल्या विनोदाची विनंती करू शकता.

Meta प्रॉडक्टवर AI-जनरेटेड कंटेन्ट कशाप्रकारे ओळखले जातो

Meta प्रॉडक्टमध्ये पारदर्शकता वाढविण्यात मदत करण्यासाठी AI टूल वापरून तयार किंवा सुधारित केलेला कंटेन्ट ओळखला आणि लेबल केला जाऊ शकतो.

असे अनेक AI टूल आहेत जे कंटेन्ट तयार किंवा सुधारित करू शकतात. या टूल पैकी एक टूल वापरून बनवलेल्या किंवा सुधारित केलेल्या काही कंटेन्टमध्ये उद्योग-मानक सिग्नल असू शकतो, जो AI टूलचा वापर करून तयार किंवा सुधारित केला जाणारा कंटेन्ट ओळखतो. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती त्यांच्या फॉलोअरना शेअर करण्यासाठी सामान्य फोटो संपादन टूल वापरून इमेज संपादित करू शकते.

फोटो संपादन टूल इमेजचा आकार किंवा रंग बदलण्यासाठी AI वापरत असल्यास, इमेजमध्ये एक सिग्नल असू शकतो जो AI वापरून फोटो संपादित केला होता हे दर्शवेल. कंटेन्टला लेबलची आवश्यकता आहे किंवा नाही हे निर्धारित करण्यासाठी हे सिग्नल Meta च्या सिस्टीमद्वारे वाचले जातात.

Meta प्रॉडक्टवर AI-जनरेटेड कंटेन्ट लेबल केला जातो तेव्हा

Meta प्रॉडक्टवर निःशुल्क कंटेन्ट किंवा जाहिरात नसलेला कंटेन्ट लेबल केला जाईल याचे काही मार्ग आहेत.

  • Meta सिस्टीम निःशुल्क कंटेन्टमधील AI सिग्नल शोधतात तेव्हा
  • तृतीय-पक्ष टूलद्वारे तयार केलेल्या कंटेन्टमध्ये सिग्नल असू शकतात जे दर्शवितात की कंटेन्ट AI वापरून तयार केला आहे किंवा सुधारित केला आहे. कंटेन्ट AI वापरून तयार केला आहे असे दर्शविणारे सिग्नल असल्यास त्या कंटेन्टला AI माहिती असे लेबल केले जाईल. AI वापरून सुधारित केला आहे असे सूचित करणारे सिग्नल असलेल्या पोस्ट, स्टोरी, रील किंवा थ्रेडवरील कंटेन्टसोबत AI माहिती असे लेबल नसेल. तुम्ही मेनूवर क्लिक करून पोस्ट, स्टोरी, रील किंवा थ्रेड AI द्वारे कसे सुधारित केले गेले याबद्दल अधिक जाणून घेऊ शकता.

  • लोक त्यांचे AI-जनरेटेड कंटेन्ट लेबल करतात तेव्हा
  • Meta प्रॉडक्ट वापरणारे लोक देखील AI-जनरेटेड कंटेन्ट किंवा AI वापरून सुधारित केलेला कंटेन्ट शेअर करताना त्यांच्या कंटेन्टला AI माहितीसह असे लेबल करू शकतात, आणि काही प्रकरणांमध्ये तसे करणे आवश्यक आहे.

    Meta तंत्रज्ञानामध्ये AI-जनरेटेड कंटेन्टबद्दल अधिक जाणून घेतल्याने Meta पारदर्शकतेबद्दलचा दृष्टिकोन अपडेट करणे सुरू ठेऊ शकते.

तुम्ही इतर AI लेबल पाहू शकता

Meta चे AI टूल वापरून तयार किंवा संपादित केलेले आणि Facebook, Instagram किंवा Threads वर पोस्ट, स्टोरी, रील किंवा थ्रेड म्हणून शेअर केलेला कोणताही कंटेन्ट आपोआप AI कंटेन्ट म्हणून लेबल केला जाऊ शकतो, किंवा काही प्रकरणांमध्ये दृश्यमान वॉटरमार्क दर्शवलेला असू शकतो.

नोट: सर्व AI कंटेन्टमध्ये तो ओळखण्यासाठी आवश्यक असलेली माहिती नसते.

AI माहिती लेबल केव्हा आवश्यक असते

कंटेन्टमध्ये AI वापरून डिजिटली तयार, सुधारित किंवा बदललेला फोटोरिॲलिस्टिक व्हिडिओ किंवा रिॲलिस्टिक-साउंडिंग ऑडिओ असल्यास, Meta ला AI लेबलची आवश्यकता असते.

नोट: आवश्यक असताना लेबलशिवाय शेअर केलेल्या कंटेन्टसाठी दंड होऊ शकतो.

AI वापरून तयार केलेल्या किंवा सुधारित केलेल्या इमेजसाठी Meta ला लेबलची आवश्यकता नाही. तथापि, सिस्टीमना ते AI-जनरेटेड होते किंवा AI वापरून सुधारित केले होते असे आढळल्यास तरीही या इमेजना लेबल दिले जाऊ शकते.

लेबलची आवश्यकता असलेल्या डिजिटली तयार केलेल्या कंटेन्टची उदाहरणे:

  • बाजारपेठेत फिरत असलेल्या लोकांच्या ग्रुपचा वास्तववादी दिसणारा व्हिडिओ
  • दोन लोक बोलत असल्याची ऑडिओ फाईल
  • AI-जनरेटेड व्होकल्सचा वापर करून तयार केलेले गाणे
  • वास्तववादी AI-जनरेटेड व्हॉइसओव्हरसह कथन केलेली एखादी रील

लेबलची आवश्यकता नसलेल्या डिजिटली तयार केलेल्या कंटेन्टची उदाहरणे:

  • कार्टून सदृश शैलीत तयार केलेला घराबाहेरील लँडस्केपचा व्हिडिओ
  • बैलावर स्वार झालेल्या व्यक्तीची इमेज (Meta ला इमेजसाठी लेबलची आवश्यकता नाही)

तुम्ही पारदर्शकता केंद्रामध्ये या आवश्यकतेबद्दल अधिक वाचू शकता

नोट: आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर AI-जनरेटेड कंटेन्टबद्दल अधिक जाणून घेतल्यानंतर आम्ही आमचा पारदर्शकता दृष्टिकोन अपडेट करू. गोपनीयता केंद्रामध्ये जनरेटिव्ह AI बद्दल अधिक जाणून घ्या.

Share

Was this article helpful?

होय
नाही